राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर लोकसभेत बोलताना त्यांनी आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘अब की बार ४०० पार’ अशी घोषणा करत भाजपाला ३७० जागा मिळण्याचा विश्वास दर्शवला.
















