अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणावरून महाराष्ट्र हादररेला असतानाच पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणांवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. अभिषेक घोसाळकर काय कुत्र्याचं पिल्लू होतं का? आम्ही काय कुत्र्याचं मेलेलं पिल्लू आहोत का? असा प्रश्न उपस्थित करत राऊतांनी फडणवीसांच्या विधानाचा समाचार घेतला. दरम्यान, एखाद्या गाडीखाली श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील, असं विधान फडणवीसांनी केलं होतं.