दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोर मॉरिस नरोन्हाने घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून स्वतःही आत्महत्या केली. या संपूर्ण प्रकणाने महाराष्ट्र हादरला आहे. विरोधकांकडून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी आज उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार असून ते काय भूमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून आहे.