हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साताऱ्यात मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. या वेळेला बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी शिवरायांप्रति असलेल्या आपल्या प्रेमळ भावना व्यक्त करण्यासाठी चक्क छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारली. तसंच साताऱ्यातील शिवतीर्थावर असलेल्या महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं.