मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक सादर केलं आणि हे विधेयक एकमताने मंजूर झालं आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांसह सर्वांचे आभार मानले. तसंच ओबीसी समाजाला अडचण होईल असा कोणताही मार्ग स्वीकारलेला नाही, हेही स्पष्ट केलं.