बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चे आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) खासदार सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामतीतून सुनेत्रा वहिनींनी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, असं तटकरे म्हणाले. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
















