भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी (२४ मार्च) उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. या यादीतील सर्वांत ठळक नाव म्हणजे अभिनेत्री कंगना रणौत. बॉलीवूड क्वीन म्हणून ओळखल्या जाणार्या कंगनाला भाजपाने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. आता कंगनाला लोकसभेची उमेदवारी मिळणे निश्चित होते का? तिला लोकसभा उमेदवारी देण्यामागे भाजपाची भूमिका काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..




















