बारामतीमधील लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागून आहे. सुप्रिया सुळेंच्या समर्थनार्थ शरद पवार हे सहकुटुंब प्रचारात उतरल्याचं चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पत्नी सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ मतदारसंघात सभा घेत आहेत. लोकांना भावनिक केलं जातं, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवार यांच्या सभेतील एका दृश्यावर भाष्य केलं आहे.
 
   
   
   
  







 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 



 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  