राज्यात आज चौथ्या टप्यातील ११ मतदारसंघात मतदान पार पडतंय. यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या राज्यातील लोकसभा जागा आहेत. पुण्यामध्ये सकाळपासूनच मतदानाला सुरवात झाली आहे. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेसुद्धा मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान केलं असून तिने सर्वांना मतदान करण्याचं आवाहनही केलंय