लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. २० मे रोजी महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. भाजपाकडून चारशे पारचा नारा सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या प्रचार रणनीतीवर राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये भाष्य केलं आहे.












