शनिवारी (१ जून) लोकसभा निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आणि त्यात बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी ‘काटें की टक्कर’ असणार हे स्पष्ट झाले होते. केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष या लढतीकडे लागून राहिले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालाअगोदरचं पुण्यात इंदापूर येथे सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर झळकले. त्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले. इंदापूर मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसीम बागवान यांनी हा विजयाचा बॅनर लावला. एकुणात आता इथे ‘बॅनरवॉर’ला सुरुवात झाली आहे.