पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री पदाची
शपथ घेतल्यानंतर प्रथमच पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे ‘कडक हेडमास्तर’ म्हणून मी पाहतोय. सहकार खात्याचे राज्यमंत्रीपद मला मिळणार हे कळल्यावर पोटात गोळा आला होता, अशी आठवण त्यांनी सांगितली.

















