राज्याचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत हा अर्थसंकल्प की जुमला संकल्प? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसंच लाडकी बहीण योजनेचं स्वागत करत त्यांनी मुलांसाठीही योजना असावी, असं म्हटलं.
 
   
   
   
  







 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 




 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  