मुसळधार पावसाचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे आता राजकीय नेत्यांना देखील बसत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाला चक्क गळती लागली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वडेट्टीवार यांनी सरकार आणि प्रशासनाच्या कामावर बोट ठेवलं आहे.












