महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा आज मुंबईत पार पडला. मेळाव्यात आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील भाषण केलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने लढण्याचं आवाहन केलं. यावेळी सर्वांसह शरद पवार यांनी देखील हात वर करून आदित्य ठाकरे यांच्या आवाहनाला दाद दिली.











