मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. अनेक दावे केले जात आहेत. अशातच आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टील वापरलं असतं तर पुतळा कोसळला नसता, असं गडकरी म्हणाले.