Mumbai Local Central Railway Update: लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांमध्ये अनेकदा भांडणे झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. यासंदर्भातील अनेक भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. अनेकवेळा ट्रेनमध्ये जागेवरून भांडणं होतात. आश्चर्य म्हणजे बडेजाव करून भांडणाऱ्यांमध्ये अनेकदा विना तिकीट फुकट प्रवास करणाऱ्यांचा सुद्धा समावेश असतो, अशाच प्रकारच्या तक्रारींचे प्रमाण वाढल्यामुळे आता मध्य रेल्वेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेने प्रवास करत असताना एखाद्या प्रवाशाला काही अडचण असेल किंवा त्याची काही तक्रार असेल तर थेट व्हॉट्सॲपद्वारे तक्रार करता येणार आहे, म्हणजे मध्य रेल्वेने आता व्हॉट्सॲप हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. व्हॉट्सॲप हेल्पलाईन सेवेमुळे आता फक्त वैध तिकीट असलेले प्रवासी एसी आणि फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करतील, याची खात्री करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं