पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (११ सप्टेंबर) रात्री सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी चंद्रचूड यांच्या घरातील गणपतीचं दर्शन घेतलं आणि आरतीही केली. या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे नियमांत बसतं का? यावरही आता चर्चा सुरू आहे. असं असतानाचा आता विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाने काँग्रेसच्याच काळातील एक फोटो समोर पोस्ट केला आहे.