महायुती सरकारने आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण या योजनेवर विरोधकांनी टीका केली. लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे.”लाडकी बहीण योजनेला टच करायला गेलात तर त्याचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा.”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
 
   
   
   
  







 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 



 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  