२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. पण अवघ्या ८० तासांत हे सरकार कोसळलं होतं. २०१९ मधील या शपथविधीबद्दल आता अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला. “एनसीपी भाजपा युतीसाठी पाच बैठका झाल्या होत्या. मी पुन्हा सांगतो अमित शाह, गौतम अदाणी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार या बैठकीला होते.”, असं अजित पवारांनी एका मुलाखतीत सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
 
   
   
   
  







 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 





 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  