काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या दोन दिवसांपासून साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी होते. त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी डाॅक्टरांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृती विषयी माहिती दिली आहे. दरम्यान, आज एकनाथ शिंदे मुंबईत परतणार असल्याचं बोललं जात आहे.