रत्नागिरीतील ठाकरे गटाचे १० माजी आमदार शिंदे गटात प्रवेश करणार,असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसंच ऑपरेशन टायगरची सुरुवात रत्नागिरीतून होणार, असंही ते म्हणाले. आज पत्रकार परिषद ते बोलत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटातील राजन साळवी यांच्या नाराजीची चर्चा आहे. त्यामुळे ते शिंदे गटात प्रवेश करणार का? याबाबतही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे.