संतोष देशमुख हत्याप्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासह अन्य मागण्यांसाठी देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं आहे. त्यानंतर सरकारने त्यांची ही एक मागणी मान्य केली. यावर ज्येष्ठ विधिज्ञ उज्जवल निकम यांनी प्रतिक्रिया देताना मस्साजोगच्या ग्रामस्थांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.