Beed: बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर टोमॅटोचा लाल चिखल करून सामाजिक कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी आंदोलन केले. लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या टोमॅटोला सध्या पाच ते दहा रुपये प्रति किलो दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर २०० किलो टोमॅटोचा ‘लाल चिखल’ करुन आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आली.