उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेनं सध्या जोर धरला आहे. असं असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी २०१७मध्ये फिसकटलेल्या युतीच्या चर्चेची पुन्हा आठवण करून दिली. बाळा नांदगावकर स्वतः दादरहून मातोश्रीला गेले होते. पण, उद्धव ठाकरे पहिल्या मजल्यावरून तळ मजल्यावर आले नाहीत, असा टोला संदीप देशपांडेंनी लगावला.