Sangram Thopate: काँग्रेसला हात दाखवून माजी आमदार संग्राम थोपटेंनी भाजपात प्रवेश केला आहे. भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्ष सोडला. त्यानंतर ते भाजपात जाणार हे स्पष्ट झालं होतं. त्यानुसार आज त्यांचा भाजपात प्रवेश झाला आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला.यानंतर संग्राम थोपटे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आहे.