नाशिक शहरातील काठे गल्लीतील वादग्रस्त धार्मिक स्थळास भेट देण्यासाठी आग्रही भूमिका घेणारे काँग्रेसचे नेते तथा उपाध्यक्ष हुसेन दलवाई यांना शहर पोलिसांनी अडवून ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांना गंगापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या कारवाईमुळे नाशिमधील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. राजकीय व्यक्तींना संबंधित ठिकाणी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यामुळे दलवाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.