Jamkhed Small Boy Beaten By Students In Hostel: जामखेड -शहरातील आरोळे वस्ती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासी वसतीगृहात धक्कादायक प्रकार इयत्ता आठवीच्या मुलांना नववीच्या मुलांना बेल्ट ने मारहाण झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दि. २१ रोजची घटना आहे. जामखेड मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर निवासी वस्तीगृह येथे अल्पवयीन मुलांना जबर करण्यात आली आहे.ही घटना परस्पर दाबण्याचा प्रयत्न झाला मात्र याचा व्हिडिओ व्हायरल झाला या मुळे खळबळ उडाली आहे.हे प्रकरण आता पोलीस स्टेशन कडे गेले आहे.नेमकी कोणत्या कारणाने मारहाण झाली याची चौकशी सुरू आहे.