अहिंसा हा भारताचा धर्म आहे, भारतीय मूल्यांचा एक अविभाज्य घटक आहे. पण दहशतवादी, अत्याचारी, गुंड लोकांना धडा शिकवणंही आवश्यक आहे. रावणाचा वध त्याचा नायनाट करण्यासासाठी नाही तर त्याच्या भल्यासाठी केला गेला होता असंही उदाहरण यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली. द हिंदू मेनिफेस्टो नावाच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं. हा सोहळा दिल्ली या ठिकाणी पार पडला.