पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये पर्यटकांचा घोळका दिसत असून मागून गोळीबाराचाही आवाज ऐकू येत आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. एक पर्यटक झिपलाइन करताना अचानक गोळीबार सुरू झाला. त्यावेळी झिपलाइन ऑपरेटर अल्ला हू अकबरचा नारा देत होता. पर्यटकाने आपला अनुभव सांगितला आहे.