Pahalgam Attack दहशतवाद हा काय असतो, हे आम्ही डोळ्यांना पाहिलंय, अनुभवलंय आणि सोसलंय. दहशतवाद्यांचा द्वेष काय असतो, याचा अनुभव आम्ही घेतला. आम्ही त्यांच्यासमोर हात जोडलेत. त्यामुळे राजकारण्यांनी कृपा करुन आमच्या भावनांशी खेळू नये. किमान माणुसकी म्हणून आणि आम्ही काय भोगलंय याचा विचार राजकारण्यांनी करावा, अशी विनंती पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नीने केली आहे. पहलगाम या ठिकाणी मागच्या मंगळवारी म्हणजेच २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. २६ पर्यटकांपैकी ६ पर्यटक हे महाराष्ट्रातले होते.