जिद्द व चिकाटीने युपीएससी परीक्षा मुलगी उत्तीर्ण झाली. सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पुसद येथे घडली. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांनी महागाव तालुक्यातील माळवागद येथे पेढे वाटून आनंद साजरा केला जात होता. अशातच अचानक मोहिनीचे वडील प्रल्हाद खंदारे यांच्या छातीत दुखू लागलं. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.