Thief Robbed 250 Gram Gold From Family: सिडको वाळुज महानगरात राहणारे सचिन नारायण चव्हाण यांचे चोरट्याने घर फोडून तब्बल २२ ते २५ तोळे सोने यासह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याने, सिडको वाळुज महानगरात राहणाऱ्या चव्हाण कुटुंबियांवर अक्षरशः आक्रोश करण्याची वेळ आली आहे. सचिन यांचे आई, वडील नातेवाईकाच्या लग्नासाठी नांदेड येथे गेले असता, चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून कपाट तोडून कपाटातील २७ तोळे सोने, तसेच रोख रक्कम चोरून चोरटे पसार झाले.