गेल्या वर्षी महाराष्ट्रात प्रशिक्षणार्थ अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर ओबीसी आरक्षणाचा गैरवापर केल्यासह अनेक अनेक आरोप झाले होते. त्यानंतर तिला सेवेतून निलंबित करण्यात आलं. आता असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. या वर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक नवीन वाद निर्माण झाला आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणारी पूर्वा चौधरी या वादाच्या केंद्रस्थानी आहे. देशातून ५३३ वा क्रमांक मिळवणारी पूर्वा चौधरी सोशल मीडियावर तिचा निकाल शेअर केल्यानंतर चर्चेत आली आहे.