पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. मध्यरात्री पाकिस्ताननं जम्मू काश्मीरसह जैसलमेर आणि अन्य भागांत ड्रोन हल्ले केले. या हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील स्थानिकांनी आता प्रतिक्रिया दिल्या आहेत.