China Extend Support To Pakistan During India vs Pak Tensions: २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात फोनवर चर्चा झाली भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली असली तरी यानंतर चीनने घेतलेली भूमिका ही सर्वांच्याच भुवया उंचावणारी आहे. पाकिस्तानने शनिवारी अमेरिकेच्या मध्यस्थीतून झालेल्या चर्चेनंतर पूर्ण आणि तात्काळ युद्धविरामाला सहमती दर्शवली