Rifleman Sunil Kumar Martyr: जम्मू-काश्मीर लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांनी कर्तव्य बजावताना देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. सीमेपलीकडून झालेल्या जोरदार गोळीबारात त्यांना वीरगती प्राप्त झाली आहे. आज शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव त्यांच्या गावी पोहोचताच, शोक आणि देशभक्तीचा संगम दिसून आला. त्यांचे अंत्यदर्शन घेताना “शहीद सुनील कुमार अमर रहे” च्या जयघोषाने गाव दुमदुमून गेले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हा काळजाला घरं पाडणारा होता.