Pune Youth Beaten over Protest Supporting Palestine: पुण्यातील कर्वेनगर परिसरात काही तरुणांच्या एका ग्रुपवर अन्य एका गटाने पाकिस्तानला पाठिंबा देत असल्याचा आरोप करत हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील डॉमिनोजच्या बाहेर इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईन या गटाने निदर्शने केली होती, ज्यावेळी उपस्थित असलेल्यांनी त्यांच्यावर “पाकिस्तानला पाठिंबा” देण्याचा आरोप करून निषेध करायला सुरुवात केली. अगदी १०- १५ मिनिटांतच या प्रकरणाला अतिशय हिंसक वळण प्राप्त झाले आणि इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टाईनच्या गटातील तरुणांना भररस्त्यात मारहाण करण्यात आली. नेमकं हे प्रकरण काय व आतापर्यंत यात कोणती तथ्य समोर आली आहेत हे आपण व्हिडीओमध्ये जाणून घेऊया.