Marathi – Hindi Controversy In Bhandup Women Alleges Dominos Pizza: भांडुप मध्ये डॉमिनोजच्या पिझ्झा डिलिव्हरी बॉयने मराठी बोलणार नाही असा वाद निर्माण केला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. यावरून पुन्हा मोठा वाद निर्माण झाला आहे. १० तारखेला भांडुपच्या डॉ. वैदही पाठक यांच्या मुलाने डॉमिनोज मधून पिझ्झा मागवला होता. रोहित लेवरे हा डिलिव्हरी बॉय याने मराठीत बोलण्यास नकार दिल्याने हा वाद वाढल्याचे पथक यांनी पत्रकारांना सांगितले आहे. तर आता मनसेच्या शाखेत बोलावून या डिलिव्हरी बॉयला माफी मागायला लावण्यात आली आहे.