देशात पुन्हा एकदा कोरोनाने तोंड वर काढायला सुरूवात केली असून सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. देशात 1010 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वाधिक 430 रुग्ण हे केरळमध्ये सापडले. महाराष्ट्रामध्ये 210 आणि दिल्लीमध्ये 104 रुग्णांची भर पडली. तर देशभरात एकूण 10 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाच्या चार नव्या व्हेरिएंटचा शोध लागला असून त्यापैकी JN.1 या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत.