Sanjay Raut: ‘इंडियन एक्सप्रेस ग्रुप’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’ या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. “शरद पवारांबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात. पण काही गोष्टी अशाही आहेत, ज्या मी स्वीकारत नाही. पण मी त्यांच्या सातत्याचे कौतुक करतो. या वयातही ते जिंकले, हरले किंवा परिस्थिती कशीही असली तरी काम करत राहतात.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.