वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या फोनमधील काही चॅट्सचा उल्लेख केला. त्यावर अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर वैष्णवीचं दुसऱ्या मुलाबरोबर बोलणं सुरू होतं तर तिला तेव्हाच माहेरी का पाठवलं नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.










