Vaishnavi Hagwane Case, Gautami Patil Reaction: वैष्णवी हगवणे प्रकरण चर्चेत आल्यापासून गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आयोजित एका कार्यक्रमात गौतमी पाटील हिने बैलासमोर नाच केला होता. त्याहीवेळेस हा मुद्दा चर्चेत राहिला होताच पण आता वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर गौतमीचा हा व्हिडीओ नव्याने व्हायरल होत आहे. आता स्वतः गौतमीने याप्रकरणी एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान खुलासा केला आहे.