Dowry Case In Chhtrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या चौका येथे राहणाऱ्या हिना शेख या विवाहितेला सासरच्या मंडळींनी माहेरून 25 लाख रुपये घेऊन ये म्हणत शोल्डरने शरीरावर 17 ठिकाणी चटके देऊन छळ केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर हिनाने पोलिसात तक्रार दिली, आणि आज अखेर हिनाचा नवरा अजीमसह सासू, दीर, जाऊ आणि 2 नणंद अशा सहा जणांवर फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.