नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या मुलीचा विवाह सोहळा सोमवारी संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या वेळी उपस्थिती लावली. त्यामुळे आमने-सामने येण्याचा योगायोग टळला. दरम्यान संजय राऊत आणि शिंदे यांनी नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.














