पंजाबच्या तर्न तरण जिल्ह्यातून पोलिसांनी गगनदीप सिंग या संशयित व्यक्तीला अटक केली आहे. ऑपरेशन सिंदूरची कारवाई सुरू असताना मोहिमेबद्दलची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली जात असल्याचा आरोप गगनदीपवर आहे. गगनदीपकडून पोलिसांनी एक मोबाईल फोन ताब्यात घेतला असून त्यातूनही काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.