अहमदाबाद विमानतळावरून टेकऑफ केलेलं विमान इमारतीवर कोसळलं. या इमारतीमध्ये असलेली अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली आहे. विमान कोसळल्यानंतर लागलेल्या आगीतून ऐश्वर्याने ब्लँकेट गुंडाळून स्वतःचा जीव मोठ्या धाडसानं वाचवला. या अपघातामुळे ऐश्वर्याला मोठा धक्का बसला. अंगावर शहारे आणणारा भयावह अनुभव तिने आपल्या
कुटुंबीयांना सांगितला.