अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात २६५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गुजरातच्या लॉरेन्स डॅनियल ख्रिश्चनचाही समावेश आहे. लॉरेन्स हा आपल्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी भारतात आला होता. १२ जूनला अहमदाबादहून तो पुन्हा लंडनला परतणार होता. मात्र विमानाच्या टेकऑफनंतर काही मिनिटातच मोठा अपघात झाला. या अपघातात आपला एकुलता एक मुलगा गमावल्याचं सांगताना लॉरेन्सच्या आईनं टाहो फोडला.