शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दरम्यान, मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने एक सर्व्हे प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी युतीबाबत आपणही आशावादी असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर नागपूर मनपाविषयी देखील त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.