उत्तराखंड राज्यातील रूद्रप्रयाग जिल्ह्यात आज रविवारी पहाटे झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेत जिल्ह्यातील वणी येथील एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले. राजकुमार जयस्वाल (४२), श्रद्धा जयस्वाल (३४) आणि काशी जयस्वाल (२) अशी मृतांची नावं आहेत. जयस्वाल कुटुंबीय अन्य नातेवाईकांसोबत चारधाम यात्रेकरीता गेले होते. मात्र या दुर्घटनेत पती, पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाल्याने जयस्वाल कुटुंबावर आभाळ कोसळलं आहे.